मंठा-परतुर आगारातील एसटी कर्मचार्यांच्या संपाने प्रवाशांची गैरसोय ; खाजगी वाहतूकीनी केली आथिँक आडवणुक
मंठा (सुभाष वायाळ) राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य भर चालु असलेल्या अनेक दिवसाच्या संपात सोमवार पासुन परतुर -मंठा परिवहन महामंडळ विभागातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या संपाने एसटीच्या बसेसची वाहतूक पुर्णतः ठप्प आहे. परिणामी हजारो प्रवाशांची सणासुदीच्या काळात मोठी हेळसांड होत आहे. सोमवार पासून एसटी बस वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळेच सणासुदीत हजारो प्रवाशी अक्षरशः हैराण आहेत. आज ना उद्या संप मिटेल, बस वाहतूक सुरु होईल, या अपेक्षापोटी प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास टाळला. परंतु, संपकरी व सरकार यांच्यात कोणतीही तडजोड होईनाशी झाली आहे. परिणामी एसटीची चाके जागच्या जागीच ठप्प आहेत. या दरम्यान औरंगाबाद ,मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांकडील तसेच नगर,अमरावती वगैरे भागातील ये-जा करणारी वाहतूक बंद आहे. प्रवाशांचे हाल सुरु आहेत. खाजगी वाहतूकीने संपाच्या या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी लूट सुरु केली आहे. ते पुणे, नागपूर, मुंबई वगैरे भागात ये-जा करण्याकरीता आव्वा की सव्वा दर आकारले जात आहेत. त्यातच कहर म्हणजे खाजगी वाहतूकीने डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ या संपाचा लाभ उठविण्याकरीता दर वाढवून ठेवले आहेत. या प्रकाराने प्रवाशी हतबल झाले आहेत.सध्या सनासुदीचे दिवस असल्याने खेड्यापाडयातुन येताना अक्षरशः मोटारसायकलद्वारे प्रवाशी वाहतूक सुरु झाली आहे.तसेच खेड्यातील लोकांना शहरात येताना खुप ञास सहन करावा लागला व खाजगी वाहतूकदारांची अरेरावी सहन करावी लागली.सामान्य माणसाची एकच मागणी आहे की, संप मिटावा व सुरळीत वाहतुक चालु व्हावी .