शिक्षण संस्थचे ह भ प अर्जुन महाराज बादाड यांच्या किर्तन संपन्न
तळणी (रवी पाटील) जवळच असलेल्या कानडी येथील कानीफनाथ मंदीरात आज मंगळवारी संकष्टी चतर्थी निमीत्य नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थचे ह भ प अर्जुन महाराज बादाड यांच्या किर्तनाचे आयोज करण्यात आले होते चतुर्थी निमीत्य मंदीरातील गणेश मूर्तीला नवीन चांदीचा मुकुट प्रकाश तात्या खंदारे यांच्या वतीने देण्यात आला
या किर्तन प्रंसगी जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या
भक्ती आम्ही केली सांडूनी
उद्वेग पावलो हे संग सुख याचे ॥१॥
सुख आम्हां झाले धरीता यांचा संग पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥
तुका म्हणे सुख बहु झाले जिवा घडली या सेवा विठोबाची ॥३॥
या अंभगावर सुंदर निरुपण केले कलयुगातील मनुष्य आज काल भौतीक सुंखाचा जास्त विचार करु लागल्याने तो त्या सांसारीक आयुष्यातच गुरफटत चालला असल्याने त्याला भक्ती मार्गाचा विसर पडला आहे भक्ती मार्गातील सुखच इश्वरी प्राप्तीचा मार्ग आहे तो मनुष्याने स्वीकारला पाहीजे मनुष्य सध्या संसारीक मार्गाने सुख शोधण्याचा प्रयत्न जरी करीत असला तरी त्या मार्गावर सुख सापडणार नाही कारण चुकीच्या मार्गाने सुख हे कधीच सापडत नाही त्याला जर सुखाची प्राप्ती करायची असेल इश्वरी सत्ता भोगायची असेल तर त्याला भक्ती मार्गानेच जावे लागेल मनुष्याचा सगळा जन्म सुखाच्या आशेत गेला आहे मनुष्याने सुखाची अपेक्षा जरी केली तरी दुःखाला सामोरे जावे लागणारच आहे सांसारीक आयुष्यात तुम्ही किती जरी सुखाचा शोध घेतला तरी ते तुम्हाला मिळणार नाही तुम्हा आम्हाला सुखाचे समाधान मिळवायचे असेल तर संतांनी घालून दीलेल्या भक्ती मार्गावर चालावे लागेल तरच तुम्हाला सुखांची प्राप्ती होईल आणि तोच खरा पूरुषार्थ आसेल
मनुष्य जीवनातील कर्मच तुमचे खरे सुख आहे कारण मनुष्य करत असलेल्या कर्मावरच
त्याची संसारीक व भक्ती मार्गातील सिद्धता सिध्द होत असते यातील भक्ती मार्गच मनूष्या साठी तारक आहे ज्ञानर्जना पेक्षा ही भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे तो मार्ग प्रत्येकाने स्वीकारला पाहीजे मनुष्याचे चांगले कर्मच त्याचा पूरषार्थ आहे तुमचे कर्म तुमचे सुख आहे तुमचे कर्म जर चांगले असेल तुम्हाला त्याचे निश्चित चांगले फळ मिळेल मनुष्याला किती जरी वाटले की तो सुखी आहे पण आतमधुन दुःखाचे कपडे घातले आहे मुत्यू लोकात मनूष्य करीत असलेल्या सुखाची अपेक्षा चुकीची आहे हा देह परत मिळवायचा असेल तर भक्ती मार्गाशीवाय दुसरा कुठला मार्ग नाही जगदगुरू तुकोबारांयाकंडे सर्व सुखाची साधने उपलब्ध असताना सुध्दा त्यानी भक्ती मार्गच निवडला म्हणुन जगाचा मालक प्रत्येक वेळेस संकटात मागे पुढे उभा राहीला विठ्ठलाच्या भक्ती शिवाय तुकोबारायाने कुठल्याच भौतीक सुखाना स्पर्श केला नाही किवा ते सुख स्वीकारले सुध्दा नाही म्हणुन त्याचा उद्धार झाला मनूष्याला जर त्याचा उद्धार करायचा असेल तर भक्ती मार्ग स्वीकारावा लागेल
ज्ञानोबारायांनी सुध्दा सुखाची परिभाषेला मर्यादेत ठेवले आहे आज कालचा मनूष्य इंगळाच्या आथरुणावर झोपून सुखाची अपेक्षा करत आहे पंरतू संसार रुपी इंगळावर बसून मनुष्याला कधीच सुख प्राप्त होनार नाही कारण तेथे भक्ती नाही कलयुगातील प्रत्येक प्राणीमात्राला दुःख नाही असे नाहीच ते सगळे इश्वरी सुञ आहे त्याला सामोरे जावेच लागेल
ज्ञानी माणसालाच अंहकांर होतो अज्ञानी माणसाला त्याचा स्पर्श होत नाही मनुष्याने ज्ञानी असावे पण त्या मागे त्याची भक्ती पण बघणे गरजेचे आहे सध्याच्या या कलयुगात धर्माचे रक्षण होणे गरजेचे आहे एकसंघ राहणे गरजेचे प्रत्येकाने आपले कर्तव्य निभावली पाहीजे गाय जोपासली पाहीजे धर्मावर विविध आघाते होत असली तरी आपण आपल्या देव देश अन धर्मासाठी कटीबध्द असले पाहीजे विदेशी स्वस्कृंती आपल्यासाठी घातक आहे आपले सण उत्सव याना मोठा शास्त्राचा आधार आहे ते परपरेने आपन साजरे केले पाहीजे तरच आपली संस्कृती टिकून राहील
चतूर्थी निमित्य सपूर्ण गावांमध्ये मिरवणुक काढण्यात आली या किर्तन सेवेसाठी मंहत चरणदास महाराज यांची विशेष उपस्थीती होती ह भ प अर्जुन महाराज बादाड व महंत चरणदास महाराज यांच्या हाताने गणपतीला मूकूट अर्पण करण्यात आला या किर्तन सेवेसाठी नेमिनाथमहाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यानी सांथसंगत केली तर कानडी ग्रामस्थानी यासाठी परिश्रम घेतले