तळीरामांची पोलीसांच्या वाहनाला धडक गुन्हा दाखल पधरा दीवसाची शिक्षा



मंठा(रवी पाटील) तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्याची विभागीय गस्त असल्याने सपोनि उबाळे हे त्याच्या कर्मचार्यासह शासकीय वाहन क्र एम एच बी क्यू ५२३९ ने पोलीस ठाने मंठा येथे भेट देऊन परत जात असताना मंठा जालना रोडवरील बरबडा पाटीजवळ समोरून येणाऱ्या महीद्रा झायलो एम १२ जी झेड ५९३४ क्रंमांकाच्या वाहन चालकाने दारूच्या नशेतच पोलीसाच्यां गाडीला समोरुन धडक देऊन सरकारी वाहनाचे नुकसान केले असल्याने अंकुश खरात यांच्या फिर्यादीने मंठा पोलीस ठाणे येथे गुरन ३८३ / २०२१ कलम २७९ ४२७ भादवी सह कलम १८५ मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशाने आरोपीस अटक करण्यात आल्यानंतर संदर गुन्हाचा  २४ तासाच्या आत तपास करून दोषारोप पत्रासह न्यायालयात दाखल केले असता प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश याच्या समोर दाखल करून न्यायालयाने कलम २७९ मध्ये १००० रुपये दंड व भादवी कलम ४२७ मध्ये २०० रू दंड व कलम १८५ मोटर वाहन कायद्यानुसार २०००रू दंड असा एकूण ३२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला दंड न भरल्यास पंधरा दिवसाची कैद सुध्दा यावेळी न्यायालयाकडून सुनावण्यात आली 

सदर कामगिरी जालना पोलीस अधिक्षक विनायक देशमुख अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख उपविभागीय अधिकारी राजू मोरे परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय देशमुख पोलीस निरीक्षक मंठा पोहेका ७५६ एस जी चव्हाण पोका २६१ व्हि. एस कातकडे यानी केली असून सदर कामगिरी वीषयी अभिनदन केले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....