मंठा तालुक्यातील तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कंत्राटी भरती करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी
मंठा (सुभाष वायाळ)-दि.15 तळणी हे मंठा तालुक्यातील सर्वात शेवटचे विदर्भाच्या सिमेजवळील गाव असून या ठिकाणी आरोग्य सुविधांचा खूप मोठा अभाव आहे परिसरातील साधारणता ४० पेक्षा अधिक गावांची बाजारपेठ म्हणून तळणी या गावाकडे बघितले जाते शासनाने खूप मोठा खर्च करत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिले आहे परंतु कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांची मोठी अडचण झाली आहे अशा परिस्थितीत कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करण्यात यावी. अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे
मागील पंचवार्षिक मध्ये लोणीकर यांनी स्वतः प्रयत्नपुर्वक तळणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत उभी राहिली आहे परंतु अद्याप पर्यंत त्या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही परिणामी परिसरातील नागरिकांची व रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे
परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या वापरण्यासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र उपलब्ध नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ६ उपकेंद्र अवलंबून आहेत त्यामध्ये वझर सरकटे, बेलोरा, देवठाणा ऊस्वद, शिरपूर व तळणी या उपकेंद्रांचा समावेश आहे औषधोपचारांसाठी दहिफळ खंदारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने मंजूर करून भव्य स्वरूपात उभारणी केले हे प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ शोभेची वस्तू बनणे योग्य नाही. असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे
या प्राथमिक आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी, १ सुपरवायझर, १ लॅब टेक्निशियन, १ आरोग्य निर्माता, ४ आरोग्य सेवक, २ आरोग्य सेविका, ३ शिपाई ही पदे तात्काळ भरण्यात आवश्यक आहे त्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करून परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल जिल्हाधिकार्यांना बरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यात लक्ष घालावे व कंत्राटी भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा लोणीकर यांनी व्यक्त केली आहे.