लातूरच्या अधिवेशनास मोठया संख्येने उपस्थित राहावेजिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांचे आवाहन
परतूर :(रवी पाटील) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनास जालना जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना गुजर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागातील पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश संघटक संजय भोकरे, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
इतरही अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. लातूर शहरातील बार्शी रोडवरील दयानंद सभागृहात सकाळी १० वाजता या अधिवेशनास मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले आहे.
चौकट
राज्य, विभाग, जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांवर या अधिवेशनात सखोल चर्चा होऊन उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दिगंबर गुजर, जिल्हाध्यक्ष जालना