मराठवाडा कौशल्य विकास मंडळाच्या वतीने मंत्री नवाब* मलिक यांना निवेदन ,विद्यार्थी प्रवेशास मुदतवाढ देण्याची मागणी.
प्रतिनिधी:( परतूर )
राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक हे नुकतेच घनसावंगी येथे दौऱ्यावर आले असता मराठवाडा कौशल्य विकास संस्था मंडळाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊ विद्यार्थी प्रवेश मुदतवाढदेण्या सह विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले
या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
कोविड19 विषाणू संसर्गामुळे 10 वी 12 वी चा निकाल उशिरा लागलेला आहे प्रथम प्राधान्य विद्यार्थी हे आयटीआय 11वी 12 वी सायन्स आर्ट कॉमर्स पोलटेक्निक या प्रवेशासाठी देतात या सर्व प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे तसेच शासकीय आयटीआय मधील प्रवेशास पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास अभ्यासक्रमांक मागील वर्षीप्रमाणे क्षमता पूर्ण होईपर्यंत प्रवेश प्रक्रियास मुदतवाढ देण्यात यावी तसेच एन्रॉमेंट कम परीक्षा कॉपी फिस ऑनलाइन मान्यतेप्रमाणे एकाच वेळी घावे किंवा पूर्वीच्या चालनाप्रमाणे घावे राहिलेल्या जिल्ह्याचे नूतनीकरण नविन मान्यता जुन्या संस्थेत नविन अभ्यासक्रम मुदतवाढ मिळणे विद्यार्थी प्रवेश इन्सट्यूट ऑनलाईन मधील त्रुटी सोडवणे आदी मागण्या बाबत निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांची ही उपस्थिती होती या वेळी मराठवाडा कौशल्य विकास फेडरेशनचे उपाध्यक्ष प्राचार्य जगन्नाथ.रासवे सचिन जैन , रियाज शेख आदींची उपस्थिती होती .