मंठा तालुक्यात अवैध गुटखा विक्रेत्यावर धाड पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांची कारवाई ,2 लाख 10 हजार रुपयांचा गुटखा मुद्देमालासह जप्त केला.

 
 मंठा(सुभाष वायाळ) दि. 11 मंठा तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री केला जात होता. मंठा पोलीस यांना गुप्त बातमीदार  मार्फत माहिती मिळाली की, मंठा शहरात व तालुक्यातील खेड्यांमध्ये संपूर्ण राज्यभर बंदी असलेला अवैध गुटका विक्री केला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी धाड टाकून मंठा शहरात राज निवास गुटखा, गोवा पर्पल गुटखा, गोवा लाल गुटखा,वजीर गुटखा असा एकूण जवळपास 28,840 रुपये चा माल जप्त केला आहे. व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तर दुसरीकडे ढोकसाळ या गावामध्ये गोवा, राज निवास हा गुटखा जवळपास 1 लाख 81 हजार 440 रुपये चा माल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमुख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रांत देशमुख, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय देशमुख,पोलीस कर्मचारी शंकर राजाळे, दिपक ढवळे, दीपक आडे प्रशांत काळे,आनंद ढवळे, मांगीलाल राठोड यांनी केली.
------------ चौकट
 पोलिसाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांना अवैध गुटखा विक्री बाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
                                पोलिस निरीक्षक संजय देशमुख
-------------
 अन्न व सुरक्षा अधिकारी जालना यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....