लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न,मुंडे साहेबांच्या परिश्रमामुळे, भाजपा चा वटवृक्ष राज्यात वाढला -माजी मंत्री बबनराव लोणीकर,आरोग शिबिराच्या माध्यमांतून सर्वसामान्य जनतेची खरी जनसेवा, हीच मुंडे साहेबांना खरी श्रद्दांजली
जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले अद्वितीय सर्वमान्य लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी संघर्षातून भारतीय जनता पार्टीचा वटवृक्ष महाराष्ट्र राज्यात जोपासला अशा शब्दात राज्याचे माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
ते शिरपूर तालुका मंठा येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की मुंडे साहेबांनी सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांना घेऊन राज्यात प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला या संघर्षातूनच भारतीय जनता पार्टी ही आज राज्यातील क्रमांक एकचा पक्ष असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शिरपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या ध्यानात घेऊन भारतीय जनता पार्टीने हे शिबिर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठेवलं त्याचा आपल्याला अतिशय आनंद असून शेतकरी कष्टकरी ऊसतोड मजूर यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले मुंडे साहेब यांना हीच खरी श्रद्धांजली असून दीनदलित दुबळ्यांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या निमीत्ताने संधी मिळाली त्यामुळे संयोजकाचे आपण कौतुक करतो अशा शब्दात संयोजकांनी आयोजित केलेल्या शिबिराचे लोणीकर यांनी तोंडभरून कौतुक केले
भारतीय जनता पार्टी ही समृद्ध नेतृत्वाचा वारसा लाभलेली पार्टी असून स्व पंडित दीनदयाल उपाध्याय स्व श्यामाप्रसाद मुखर्जी स्व अटल बिहारी जी वाजपेयी स्व प्रमोदजी महाजन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे भीष्म पितामह लाल कृष्ण आडवाणी जी या सर्वांनी केलेले कष्ट आज फळाला आले असून, भारतीय जनता पार्टीची सत्ता आज देशासह अनेक अनेक राज्यांमध्ये मध्ये असल्याचे या वेळी त्यांनी नमूद केले
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन देशमुख राजेश मोरे नागेश घारे नाथराव काकडे दत्तराव कांगणे नितीन सरकटे नवनाथ खंदारे केशवराव येऊन रामेश्वर सरकटे किशोर हनवते बाबासाहेब सरकटे राम किसन बोडके सुभाषराव लाड सिद्धेश्वर सरकटे कार्यक्रमाचे संयोजक शिवाजीराव थोरवे व डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते..