मंठा पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर
मंठा (सुभाष वायाळ)दि. 14 मंठा हे तालुक्याचे ठिकाण असून मंठा या ठिकाणी राज्य शासनाचा पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे. या दवाखान्या वर शहरातील व बरेच शे खेडेगावातील जनावरे, पशुपक्षी वैद्यकीय उपचारासाठी अवलंबून आहेत. राज्य शासनाने लाखो रुपये खर्चून सुसज्ज अशी इमारत बांधली आहे.परंतु या दवाखान्यामध्ये व आजूबाजूचा परिसरात घाणीचे साम्राज्य आहे व हा परिसर पूर्णपणे अस्वच्छ आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसून येतो. शेतकऱ्यांना शेतीतील काम धंदा सोडून जनावरांना या दवाखान्यामध्ये घेऊन यावे लागतात. तसेच जवळपासच्या खेड्यांमधून सुद्धा या दवाखाना मध्ये जनावरे घेऊन येतात. परंतु त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी उपस्थित नसतात.या दवाखाना मध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाहीत तसेच तेथील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर असतात. शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी वैद्यकीय उपचार करावा लागतो. व नाहक भुर्दंड भरावा लागतो. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा परिणाम पशुपालन करणारे यांच्यावर झाल्याचा दिसून येतो. मंठा परिसरामध्ये बरेचसे पशुपालक पशुपक्ष्यांचे व जनावरांचे लसीकरण सुद्धा खाजगी मध्ये करून घेतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर वेळीच लक्ष द्यावे. व शेतकऱ्यांची यातून सुटका करावी. तालुक्यातील शेतकरी व पशु पक्षी पालक राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्या बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.