तळणी येथे आ.भा. मराठा महासंघ तर्फे जन आक्रोश आंदोलन
मंठा(सुभाष वायाळ)दि.20 मंठा तालुक्यातील तळणी येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे व शिवप्रेमी मार्फत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्नाटक राज्यामध्ये काही समाजकंटकांनी विटंबना केली. त्या निषेधार्थ तळणी बस स्टॅन्ड येथे जन आक्रोश आंदोलनाला सुरुवात केली होती.व या आंदोलनाचा समारोप अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यालय मध्ये करण्यात आला. या आंदोलनामध्ये तळणी परिसरातील बहुसंख्य शिवप्रेमी तसेच तळणी गावचे सरपंच उद्धवराव पवार उपसरपंच सुधाकरराव सरकटे, कैलासराव सरकटे, बाळासाहेब देशमुख, अवि सरकटे आदी उपस्थित होते.