केहाळ वडगाव येथे पौर्णिमा उत्साहात साजरी - भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेचे उद्घाटन



 मंठा- (सुभाष वायाळ)दि. 22 मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथे भारतीय बौद्ध महासभा आयोजित जयपुर सर्कल बारागाव गट पौर्णिमा या निमित्त केहाळ वडगाव येथे भव्य  बौद्ध पौर्णिमेचे आयोजन केले होते. या पोर्णिमे निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे वडगाव शाखा उद्घाटन कार्यक्रम सुद्धा पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जालना जिल्हा अध्यक्ष महिंद्र बनकर साहेब भारतीय बौद्ध महासभा मंठा तालुका अध्यक्ष विष्णू वाघमारे, अतुल खरात ,दत्तात्रय चोरमारे ,गौतम अंभोरे . विठ्ठल मोरे, आत्माराम मोरे, अशिष मोरे ,किरण मोरे ,अशोक रणवीर , प्रकाश खाडे ,दत्तात्रय प्रधान, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन पार पडले. व नवनिर्वाचित सर्व शाखा सदस्यांना निवडून निमित्त शुभेच्छा दिल्या  पूर्णिमा ची सुरुवात महापुरुषांच्या फोटो पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या पौर्णिमाची मुख्य आकर्षक राहिल्या त्या माहोरा येथील मुली व मुलं या मुलांनी प्रमुख उपस्थित नागरिकांना चांगले पैकी या मार्गदर्शन केले  .केहाळ वडगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी पौर्णिमेचे उत्तम प्रकारे आयोजन केले होते. संपूर्ण जयपुर सर्कल परिसरातील समाज बांधव आदी या पौर्णिमेला उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....