जालना जितूर महामार्गावर गांज्याची तस्करी, मंठा पोलीसाची धडाकेबाज कारवाई दोन जण ताब्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू
प्रतिनिधी : (रवि पाटील /सुभाष वायाळ)
जालना जितूर महामार्गावरील कर्नावळ पाटीजवळ इंडियन हॉंटेल जवळ एक संशयीत ट्रक उभा असल्याची बातमी गुप्तहेराकडून मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाल्या नंतर लगेच सर्व पोलीस f कर्मचार्याना घेऊन सदर घटनास्थळावर जाऊन ट्रक सदर्भात विचारणा करून तपासणी केली असता या ट्रक मध्ये ०३क्कीटल ७ किलो च्या वर गांजा सापडला त्याची किमंत १८ लाख ४३६८० रू असुन व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक सुध्दा यावेळी जप्त करण्यात आला असून त्याची किमंत २० लाख रूपये आहे विशेष बाब म्हणजे गांजा तस्करीचा संशंय कोणाला येऊ नये म्हणून नर्सरीसाठीची विविध प्रकारची आठशे रोपे ज्याची किमंत ०६ लाख रुपये असून एकूण ४४ लाख ४३६८० रुपयचा मुद्देमाल मंठा पोलीसांनी जप्त केला आहे ताब्यात घेतलेला ट्रक क्रंमाक एम एच २१ वि एच १७५८ असून या ट्रकवरील दोनही व्यक्ती भोकरदन येथील असुन गोविद हिरालाल चांदा वय वर्ष ४२ व बादल हिरालाल चांदा वय वर्ष ३५ यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे
या तस्करी मध्ये पांढऱ्या गोण्यामध्ये लपवलेला १४८ पूडया मधील गांजा पोलीसांनी हस्तगत केला
सदरची गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख उपविभागीय अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून या कारवाईसाठी
पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत सोबत पोलीस अंमलदार दीपक आडे संदीप सुभाष राठोड घोडके प्रशांत काळे सुनील इलग इतर पोलीस कर्मचार्यानी मेहनत घेतली असून या कारवाई मुळे मंठा पोलीसांचे कौतूक होत आहे