कोरोना लस न घेतल्यास अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार- उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे.



 मंठा(सुभाष वायाळ)
   कोरोना लस न घेणाऱ्यास सेवा दिल्यास ग्रामपंचायत करणार दंड मंठा पंचायत समिती येथे दि. १६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार गावातील राशन दुकानदार,किराणा व इतर कोणत्याही आस्थापनांनी नागरिकांना सेवा देण्यापूर्वी लस घेतल्याबाबत खात्री करून घ्यावी.
       सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित किराणा दुकान,राशन दुकानदारावर ग्रामपंचायतीमार्फत दंड आकारण्यात येईल,जर दुसऱ्यांचा उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 
   "मिशन कवच-कुंडल" मोहिमेसाठी मंठा तालुका संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या ग्रामसेवक बैठकीमध्ये याबाबत सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील लसीकरणाचे काम इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असल्यामुळे यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी सर्व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन लसीकरण वाढवावे.व्यापक प्रमाणपत्र,जनजागृती करावी सर्व यंत्रणांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावे.अशा सूचना देण्यात आल्या,सदरील बैठकीत संपर्क अधिकारी संजय ईंगळे, गट विकास अधिकारी प्रशांत रोहणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोटे,एकात्मिक बाल विकास अधिकारी रमेश कोळेकर, आरोग्य विस्ताराधिकारी हरीभाऊ ताठे,गटसमन्वयक के.जी.राठोड यांच्यासह विस्तार,अधिकारी,केंद्रप्रमुख, पर्यवेक्षिका ,कॉलसेंटर,शिक्षक,ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....