वाढोना येथे लोकसहभागातून शेतीपोच रस्त्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले या उपक्रमाचे कौतुक
वाटूर(प्रतिनिधी) दि 29 डिसेंबर 2021 रोजी युवामोर्चा प्रदेश महामंत्री तसेच जि प मा उपाध्यक्ष जालना मा राहुल लोणीकर यांनी वाढोना येथे लोकसहभागातून तयार झालेल्या रस्त्यांची पाहणी केली व पुलाचे उद्घाटन केले. जालना जिल्ह्यात गाव पातळीवर असा नवखा उपक्रम राबविणारे वाढोना हे पहिलेच गाव ठरले आहे . लोकवर्गणीतून शेता पर्यंत रस्ते तयार करण्याचा हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून मा. राहुल भैय्या लोणीकर यांनी आनंद व समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले . वाढोना येथे पहिल्यांदाच लोकवर्गणीतून 3 km चे चार शेतीपोच रस्ते तयार करण्यात आलेले आहेत अश्या प्रकारचा उपक्रम संपूर्ण जालना जिल्ह्यात राबविला जावा, शेतकरी व गावकऱ्यांनी या उपक्रमातुन प्रेरणा घ्यावी यासाठी या उपक्रमास प्रसिद्धी मिळावी म्हणून मा. कलेक्टर साहेब व कर्तव्यदक्ष मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी वाढोना येथे प्रत्यक्ष भेट द्यावी व असा उपक्रम जिल्ह्यात इतर ठिकाणी राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत मा. राहुल लोणिकर यांनी व्यक्त केले तसेच पुलाचा निधी स्वखर्चातून देण्याचे आश्वासन दिले . जिल्ह्यात इतर ठिकाणी असा स्तुत्य उपक्रम राबविल्यास होईल तेवढी मदत करु असे राहुल लोणिकर यांनी सांगितले व प्रत्येक शेतकऱ्यांने यातून धडा घेऊन असे प्रेरणादायी उपक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली . या स्तुत्य पूर्ण उपक्रमास माजी सभापती रामेश्वर तनपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले सदर उद्घाटन प्रसंगी माजी सभापती मा. रामेश्वर तनपुरे ,शेतकरी नावनाथराव तनपुरे, गुलफराज शेख ,कैलास शेळके,सुरेश शेळके,बाळू तनपुरे, बाळासाहेब तनपुरे, विश्वम्बर तनपुरे, आत्माराम तनपुरे, संतोष तनपुरे, विकास शेळके,भानुदास चाळक,ज्ञानेश्वर तनपुरे, अनिल तनपुरे, शंकरराव शेळके,भारत शेळके,गजानन शेळके,बापूराव शेळके सोनू तनपुरे, आदिनाथ तनपुरे ,गणेश शेळके व गावकरी हे सर्व उपस्थित होते.