विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची मिशन कवच कुंडल लसीकरणास भेट ,खरपुडी येथे लसीकरण संपन्न


जालना (समाधान खरात) ः जालना तालुक्यातील खरपुडी जि.प शाळेत दि.15 डिसेंबर बुधवार रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्याधिकारी मनुज जिंदल, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर,  डॉ. परवेज कुरेशी, गट विकास अधिकारी एस.  व्ही कराड, गट विकास अधिकारी  सुनिल कुलकर्णी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले तसेच लसीकरणामध्ये गावामध्ये उत्तम प्रकारे जनजागृती होवून लसीकरणाचा पुर्ण टप्पा केल्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांचे व आरोग्य कर्मचार्‍यांचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्याधिकारी मनुज जिंदल यांनी अभिनंदन केले.
यावेळी उप सभापती समाधान शेजुळ, सरपंच अरुण गिरी, उपसरपंच भरत शेळुज, ग्रामसेवक आर. बी. कोथळकर, तलाठी शेख आय. ए, आरोग्य सेवक शरद पारसकर, ग्रा. सदस्य योगेश उजेड, सदस्य नकुल वाघ, सदस्य समाधान खरात, सदस्य राम देठे, सदस्य कैलास देठे, सदस्य उमेश काळे, आरोग्य, अधिकारी, सी. एच ओ. त्रिशला कदम, एस. आर. निर्मळ, कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आशा सेविका आदींची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....