मंठा ग्रामिण को ऑप. क्रिडीट सोसायटीचे दिनदर्शिकाचे वीमोचन
तळणी(रवी पाटील) येथील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यापारी यांची व परिसरात कमी वेळेत जास्त नावलौकीक निर्माण करणारी म्हणून परिचीत असलेल्या मंठा ग्रामीण को -ऑपरेटिव्ह मर्यादीत क्रेडीट सोसायटीच्या शाखा तळणी च्या वतीने येणाऱ्या नविन वर्षाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी दत्त मदीर संस्थांनचे मंहत चरणदास महाराज व नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अर्जुन महाराज बादाड यांच्या हस्ते या दिनदर्शीकेचे वितरण करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व सभासद सर्व राजकीय सामाजीक वैद्यकीय अध्यात्मीक क्षेञातील मान्यवर मडळी उपस्थीत होते यावेळी ग्रामीण भागामध्ये अशा छोटया बँकाच्या मदतीने सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांना बँकेचे मार्फत होणारी मदत मोलाची असून हक्काची बँक म्हणून संस्थेला नावलौकीक प्राप्त झाला असल्याची भावना अर्जुन महाराज बादाड यांनी यावेळी व्यक्त केली तर चरणदास महाराज यानी यावेळी संस्थेच्या पुढील सामाजिक कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा दील्या
यावेळी सस्थेचे व्यवस्थापक नितीन सरकटे यानी सस्थेसंदर्भात उपस्थित सदस्य खातेदार यांना माहीती दीली कोरोना काळात अनेक गरजूना विनाविलंब गरजेनूसार वैद्यकीय खर्चासाठी आर्थीक मदत केल्याचे नितीन सरकटे यांनी सांगीतले
यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे शरद पाटील भगवान देशमूख गोविंद भावसार काटकर साहेब रणजित सरकटे गोपाल भावसार माधव भावसार आदी उपस्थीत होते