मंगरूळ ते गेवराई शिव पांदन रस्त्याचं तहसीलदार वाघमारे यांच्या हस्ते उदघाट्न-
मंठा -(सुभाष वायाळ)दि.28 मंठा तालुक्यातील मंगरूळ गावठान ते गेवराई शिव पादंन रस्त्याच्या पांदन मुक्ती रस्ता उद्घाटनप्रसंगी मंठा तहसिलदार श्री कैलासचंद्र वाघमारे सरांनी रस्त्याचे उद्घाटन केले या प्रसंगी गावचे तलाठी लोखंडे सर, ग्रामसेवक जाधव सर, ग्रा.पं. प्रशासक धोत्रे सर, सहशिक्षक संदिप उगले सर (निवडणूक विभाग), केंद्र प्रमुख विष्णू बागल सर, पोलिस पाटील कचरु मगर, उपस्थित होते.या प्रसंगी तहसीलदार साहेबांचा सत्कार गावातील ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब बागल व लिंबाजीराव बागल यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना तहसीलदार साहेबांनी शेतरस्त्यांचे महत्त्व व गरज विशद केली,पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले व विविध शासकीय योजना,कोरोना लसीकरण व रस्ता पादंन मुक्ती साठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप उगले यांनी केले तर आभार दिपक बागल यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद बागल, वसंत बागल,विठ्ठल बागल, कल्याराव राजबिंडे,मुरली घांडगे, राधाकिसन बागल,सिध्देश्वर बागल , शंकर बागल यांनी परिश्रम घेतले.. या निर्णयामुळे गावचा दहा वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे यामुळे वाघमारे यांचे गावकरी कौतुक करत आहेत