परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि
परतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ
आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच मृत्यू झाला
तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी
झाले आहेत. या मधे शिवाजी मस्के व त्यांची पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत.
जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे
यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील
उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर सेलू पोलीसांनी धरल्याचे कळत आहे