सरपंच परिषदेच्या एकदिवशीय संपात राज्यातील सर्व संगणकपरिचालक सहभागी होणार – सिद्धेश्वर मुंडे,संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा देऊन ग्रामपंचायत मध्ये सामाऊन घेण्याची मागणी



जालना(समाधान खरात)सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र या सरपंच संघटनेच्या वतीने अनेक मागण्यासाठी २२ डिसेंबर २०२१ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून या सरपंचांच्या मागण्या बरोबरच csc –spv या कंपनी कडून नियुक्त असलेल्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर सामाऊन घेऊन कर्मचारी दर्जा व किमान वेतन राज्य सरकारने देण्याची मागणी असल्याने सरपंचांच्या मागण्याना व आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने घेण्यात आला असून या संपात राज्यातील २८००० ग्रामपंचायती मध्ये काम करणारे संगणकपरिचालक सहभागी होणार असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
       याबाबत सविस्तर वृत्त की राज्यातील सरपंचांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे,त्यामुळे मुंबई येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने अनेक मागण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेऊन एकदिवशीय संप करण्यात येणार आहे,यात प्रामुख्याने गावाच्या विकासासाठी आलेल्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी csc –spv ही कंपनी आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून हडप करत आहे,त्यात ग्रामपंचायतीचे तर नुकसान होताच आहे परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुण –तरुणी असलेल्या संगणकपरिचालकांची मागील १० वर्षापासून आर्थिक पिळवणूक होत आहे.त्यामुळे या प्रकल्पात भ्रष्टाचार करून वित्त आयोगाचा निधी हडप करणार्या् csc –spv या कंपनीला आपले सरकार प्रकल्पातून बाजूला करून संगणकपरिचालकांचा समावेश ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधात करून राज्य शासनाने किमान वेतन द्यावे ही मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.हीच मागणी सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र यांनी या संपाच्या माध्यमातून केली असून सरपंच संघटनेच्या या एकदिवशीय आंदोलनात राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....