परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

.



परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली  चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास  घडली.
            आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी  -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले  ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली.

              दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
उतरीय  तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन  करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण ,  जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी  दिली.
..........................
फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....