मंठा शहरामध्ये पार्किंगसाठी सम विषम व्यवस्था
मंठा (सुभाष वायाळ)मंठा शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी व रहदारीचा अडथळा निर्माण होत असल्यामुळे मंठा पोलिस व नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने वरिष्ठांच्या सुचनेनुसार पी-1 , पी -2 (सम व विषम ) पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विडोळी फाट्यापर्यत रस्त्याच्या दोन्ही कडेला पांढऱ्या रंगाचा पट्टा ओढण्यात येणार आहे.
याप्रसंगी मुख्याधिकारी सतिश कुलकर्णी , पोलिस निरीक्षक संजय देशमुख,पोलीस उपनिरिक्षक अस्मान शिंदे,पोहेकाॅ.दिपक ढवळे,प्रशांत काळे यांची उपस्थिती होती.