मंठा शहरात राजमाता माँ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
मंठा(सुभाष वायाळ)दि.12 मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१२बुधवार रोजी विविध सामाजिक संघटना व धर्मवीर शंभुराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आदी गोष्टीचे काटेकोरपणे पालन करून साजरी केली. विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. यामध्ये राजमाता शिक्षण प्रसारक मंडळ व राजमाता अर्बन मंठा तर्फे माँ जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माॅसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. व मान्यवरांनी जिजाऊच्या जीवनावर प्रकाश टाकला.या प्रसंगी संस्थाध्यक्ष डिगांबर बोराडे, नितिन राठोड, अचित बोराडे,वैजनाथ बोराडे ,कृष्णा खरात,संजय बोराडे ,डॉ.देवडे, प्रा.शेळके,संदिप बोराडे,प्रा.ज्ञानेश्वर वायाळ, शिवाजी जाधव,बाळासाहेब बोराडे डाॅ.संतोष मोरे,गजानन बोराडे ,महेश बोराडे,विजय बोराडे, उदय बोराडे,विजय बोराडे,शिवाजी बोराडे,उमेश भगस ,वैभव बोराडे,एकनाथ काकडे, विकास जाधव,दत्ता घुगे, करण बोराडे,पप्पु शेजुळ ,विकास घनवट ,विकास बोराडे,पवन बोराडे,धनंजय उन्हाळे,गोविद बोराडे,अशोक घारे,संतोष बोराडे ,रवि भांबळे ,सुभाष बोराडे, शाम देशमुख,अवि ठोकरे ,शरद मोरे, सुरेश बोराडे ,किष्णा हेलसकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली.