तळणि येथीलआदर्श तथा शिस्तप्रिय शिक्षक एस.टी. पाटील सर यांचे निधन

तळणी(प्रतीनीधी) येथील आदर्श शिक्षक एस टी (श्रीकृष्ण त्र्यंबंकराव पाटील) पाटील सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मूत्यू समई त्याचे वय ७८ वर्षाचे होते त्याच्या पश्चात दोन मुले दोन मुली एक भाऊ नांतवंडे असा मोठा परिवार होता तळणी येथील केद्रीय प्राथमिक शाळेचे केद्रीय मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष कारभार साभांळला कडक शिस्तीचे पाटील सर म्हणून ते सर्वाचे परिचीत होते संगळ्याना सोबत घेऊन चालणे व कितीही मोठी संकट आले तर त्याला सहजपणे सामोरे जाणे ही त्याची विशेषता त्यानी मोठया प्रमाणात घडवलेल्या विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे समाजातील प्रत्येक स्तरातील अनेक जणासोबत त्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते त्याच्या जाण्याने एक शिस्तप्रिय शिक्षक आम्ही गमावला अशा प्रतिक्रीया त्याच्या सहकारी शिक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या त्याच्या अंतिम सस्कारासाठी अनेक मान्यवरानी अंतिम दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली तळणी ग्रामस्थाच्या वतीने सरपंच उध्दवराव पवार यानी आदरांजली वाहून आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या त्याच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवारी ठीक नऊ वाजता करण्याचे ठरले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....