सन आँफ आंबेडकर ग्रुपच्या प्रयत्नाने,निराधार महिलेस मिळाला योजनेचा लाभ
परतुर (हनूमंत दंवडे) परतूर येथील सन आँफ आंबेडकर ग्रूप च्या पाठ पुराव्यामुळे एका निराधार महिलेस योजनेच्या माध्यमातून २० हजार रुपये अर्थसहाय्य मिळून दिले
गेल्या सहा ते सात महिन्या पुर्वी परतुर येथील रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या सुलताना आजम शेख वय ३७ या महिलेच्या पतीचा नैसर्गिक मुत्यु झाला होता, सन आँफ आंबेडकर ग्रूपचे सनी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी निराधार महिलेचा योजनेचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालय येथे दाखल करुन तब्बल सात महिने त्या गोष्टीचा पाठपुरावा केला.शेवटी त्याला यश येऊन 10 जानेवारी या महिलेला शासकिय योजनेतून 20 हजार रुपये अर्थसहाय्य मंजुर झाले . महिलेच्या परिवाराने सन आँफ आंबेडकर ग्रूपच मनापासुन आभार मानले . या ग्रुपच्या वतीने यापूर्वी ही अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून यापुढेही गोर गरीब निराधार साठी सन आँफ आंबेडकर ग्रूप सदैव तत्पर असेल असे ग्रुपचे सनी गायकवाड यांनी सांगितले.तसेच तहसीलदार मा.रुपा चिञक व निराधार कार्यालय येथील सर्व अधिकार्यांचे सनी गायकवाड यांनी आभार मानले