शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेत राज्य सरकार समोर आक्रमकपणे बाजू मांडल्याबद्दल इसा तर्फे लोणीकर यांचा सत्कार, असोसिएशनने मानले आभार
मागील अनेक दिवसांपासून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळा बंद करण्यात आल्या होत्या प्रत्येक वेळी कोरोना महामारी धाक दाखवत शाळा बंद करण्यात आल्या होत्या परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे ते नुकसान टाळण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करून शाळा पूर्ववत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येत होती राज्य सरकार समोर ही बाजू मांडण्यात यावी यासाठी असोसिएशनने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना विनंती केली होती त्यानुसार श्री लोणीकर यांनी अत्यंत आक्रमकपणे व मुद्देसूद असोसिएशन आणि विद्यार्थ्यांची बाजू मांडली आणि शासनाला शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यास भाग पाडले त्यामुळे आज इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्र संघटनेच्या राज्य कार्यकारणी च्या वतीने श्री लोणीकर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले
प्रत्येक वेळी करुणा महामारी चे संकट आहे या नावाखाली राज्यातील शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले होते कोरोना महामारी चे संकट असताना विद्यालय बंद आणि मदिरालय सुरू अशी परिस्थिती होती यावर लोणीकर यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत सरकारला धारेवर धरले व त्यामुळे पहिलीपासून बारावीपर्यंतच्या शाळा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यास राज्य सरकारला भाग पाडले इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेची देखील हीच मागणी होती ती मागणी लोणीकर यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने आज सत्कार करण्यात आला प्रसंगी कितीही कठीण प्रसंग असो मी कायम आपल्या सोबत आहे असा शब्द लोणीकर यांनी यावेळी संघटनेला दिला
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारत भांदर्गे मराठवाडा अध्यक्ष संदीप बाहेकर जालना जिल्हा अध्यक्ष गजानन कळकुंबे जिल्हा संघटक रामप्रसाद थोरात अभिजीत कावळे काळेसर भुतेकर सर गणेश सोळंके समीर देशपांडे चौधरी सर झीशान यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते