प्रा. शा. पांगरा तांडा शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड..====================
घनसावंगी तालुक्यातील प्राथमिक शाळा पांगरा तांडा (केंद्र) जिरडगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. पुढील दोन वर्षासाठी शालेय समितीची निवड करण्यात आली आहे . यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाजी शेषराव राठोड यांची निवड करण्यात आली. तर प्रीतम एकनाथ जाधव उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. डोळझाके आर. बी. (सचिव) गुरमे एन. एम.(शिक्षक प्रतिनिधी), विष्णू राठोड (पालक सदस्य) निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी अध्यक्ष ,उपाध्यक्ष आणि सदस्य यांचा सत्कार केला आहे. पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला विशेष उपस्थिती म्हणून संदीप बाबू राठोड, सौ. कल्पना रवी जाधव, श्याम सोपान राठोड ,सौ .वनिता राम राठोड, सौ. सुरेखा प्रकाश राठोड ,अनिल परसराम जाधव ,सौ. ज्योती राजू राठोड ,सौ .ललिता सावजी राठोड (,ग्रा.प. सदस्य)या वेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक व गावातील सरपंच यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.