क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
मंठा (सुभाष वायाळ)-दि. 03 महिलांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती [ता.३] सोमवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्यावतिने उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय देशमुख , पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, उत्सव समितीचे अध्यक्ष सोपान घनवट,बालासाहेब घनवट,गणेश शहाणे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे, विजय जुंबडे, सतीश राऊत, पिंटू लोखंडे,महादेव लोखंडे,सुरेश गोरे, विकास घनवट,अशोक घनवट, स्वप्निल खंदारे,संभाजी बनकर, कैलास बनकर,गजानन माळकर, संदीप काकडे,विक्रम घनवट,विष्णू घनवट,कुलदीप वाघमारे,परमेश्वर राऊत, प्रशांत जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.