स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भव्य लसीकरण संपन्न
(सुभाष वायाळ )29 मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कोरोना लसीकरण ठेवण्यात आले होते. या लसीकरणात वयोगट 15 ते 18 वयोगटातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले केंद्र सरकारच्या 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 296 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले या लसीकरणासाठी ,डॉ.स्वाती संजय पवार आरोग्य अधिकारी,प्रियंका असोले आरोग्य सेविका,विलास देशमुख आरोग्य सहाय्यक,वसंत गायकवाड आरोग्य सहाय्यक, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके व सर्व प्राध्यापक, आदी जणांनी परिश्रम घेऊन जास्तीत जास्त लसीकरण करून घेतले यावेळी आरोग्य विभाग, विद्यार्थी, प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते.