महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची आता पलकांची मागणि
महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची पालकांची मागणी
मंठा (सुभाष वायाळ)दि.18 मंठा तालुक्या सह महाराष्ट्रातील सर्व शाळा व कॉलेज पूर्ववत चालू करण्यात यावे यासाठी मंठा तालुक्यातील पालकांनी मंठा तहसीलदार यांना निवेदन देऊन विनंती केली की, कोरोनाच्या पार्श्वभूमी वर शासनाने सर्व शाळा व कॉलेज बंद केलेले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासावर होत आहे. तसेच गेली दोन वर्ष झाले सतत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे त्याबरोबर बौद्धिक विकलांगता सुद्धा येत आहे. शाळा बंद असल्या कारणामुळे बालविवाह, बालमजुरी, अशा समस्या उद्भवत आहेत. व ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक समस्यांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये काही पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसणे, नेटवर्क नसणे, आर्थिक भुर्दंड यातून पालकांची मुक्तता व्हावी. तसेच इतर क्षेत्रामध्ये जशी 50 टक्के सुट देऊन सुरू ठेवण्यात आलेले आहेत.कमीत कमी तशी शिक्षणक्षेत्राला सूट देऊन विद्यार्थ्यांचे होत चाललेले शैक्षणिक नुकसान टाळून शासनाने त्वरित शाळा पूर्वत चालू कराव्यात. अशी मागणी मंठा तालुक्यातील पालकांनी केलेली आहे. या निवेदनावर राजेश मोरे, शरद खराबे, सुभाष वायाळ, अनंत निर्वळ यांच्या स्वाक्षर्या आहेत.