श्रदेवगाव खवणे येथील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे हायमस्ट दिव्यांचे उदघाटन ।गल्ली ते दिल्ली परेंत पसरले येथील भक्तांचे जाळे ।प्रत्येक चतुर्थीला केले जाते महाप्रसादाचे आयोजन ।



मंठा (सुभाष वायाळ)तालुक्यातील खवणे देवगाव येथील ओंकारेश्वर देवस्थान हे मंठा तालुक्यातील अकरा गाव एक गणपती साठी एक प्रसिद्ध जागृत देवस्थान मानले जाते याठिकाणी असलेले संन्याशी महंत श्री संत भागवत गिरी व बालकगिरी बाबा यांच्या विनंतीला मान देऊन पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांनी चतुर्थी निमित्य दि.21 जानेवारी शुक्रवार रोजी येथील आश्रमासाठी उजेड राहावा म्हणुन हायमस्ट दिवा बसवला तर स्वच्छता राहावी या दृष्टीने देवस्थान साठी प्ल्यास्टिक कचरा कुंड्यां अर्पण केल्या. 
ओंकारेश्वर देवस्थान हे तालुक्यातील एक प्रसिद्ध संन्याशी आश्रम म्हणुन ओळखले जाते या ठिकाणी अनेक भक्त गण राहतात त्याच बरोबर विद्यार्थी देखील राहतात विद्यार्थ्यांना अध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण देखील दिल्या जाते 
श्री संत भागवत गिरी आणि बालक गिरी या संतांचे परिसरात तालुक्यासह देशभरात भक्त गणांचे जाळे पसरले असुन या परिसराचा विकास करण्यासाठी ठिकठिकाणच्या मोठं मोठ्या दानशूर भक्तांचे हजारो हात या ठिकाणी लागत असल्याने या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे.
या ठिकाणी अकरा गाव मिळुन एकच गणपती बसवल्या जातो त्यामुळे परिसरातील अकरा गावामधील नागरिक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात या ठिकाणी गणपती व महादेवाचे मंदिर असल्यामुळे प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी भक्तांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने दि.21 जानेवारी शुक्रवार रोजी नेर येथील महिला भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते महाप्रसादासाठी मोठ्यासंख्येने भाविकांची या ठिकाणी उपस्थिती होती.
देवगाव खवणे येथील विकसित ओंकारेश्वर देवस्थान येथे रात्रंदिवस मोठ्या संख्येने भाविक येतात त्या बरोबरच विद्यार्थी देखील वास्तव्यास राहतात हे देवस्थान ग्रामीण भागात असल्यामुळे या ठिकाणी लाईनच्या समस्या जास्त असतात त्यामुळे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांच्या प्रयत्नांतुन व पंचायत समिती शेश फंडातुन हायमस्ट लाईट व कचरा कुंड्या देवस्थानसाठी देऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले .
या वेळी हायमस्ट लाईट चे उदघाटन गुरुवर्य बालकगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्या प्रसंगी देवगाव खवणे गावकरी व परिसरातील ओंकारेश्वर भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते 
=========
ओंकारेश्वर देवस्थानचा उगम व आख्यायिका ।

खवणे देवगाव पासुन पश्चिमेस दोन किलोमीटर अंतरावर एक सुनसान माळरान होते या ठिकाणी एक छोटासा तलाव होता या तलावात एक छोटीसी दहा बाय दहा आकाराची पाण्याची विहीर होती कितीही कोरडा दुष्काळ पडला तरी देखील या ठिकाणी माणसांना आणि जनावरांना पिण्यासाठी उन्हाळ्यात देखील पिण्यासाठी पाणी राहत होते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुराखी गुरे घेऊन या माळावर जात असत त्यात एक बंजारा समाजाची पुतळाबाई नावाची महिला देखील बकऱ्या चारत चारत पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी जात होती बकऱ्या पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी आणल्या असता ती महिला बकऱ्याना हर्र हर्र करत आवाज देत असे नेहमी प्रमाणे ही महिला उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी बकऱ्या पाणी पाजण्यासाठी घेऊन गेली असता उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने या तलावात पाणी राहिले नव्हते त्यामुळे ही महिला येथील छोट्याश्या विहिरीतून बकेटीच्या साहाय्याने पाणी काढुन बकऱ्यांना पाणी पाजत असतांना तोल जावून या विहिरीत पडली सुनसान जागा असल्यामुळे या ठिकाणी महिलेला विहिरी बाहेर काढण्यासाठी कोणी ही हजर नव्हते परंतु भगव्या कपड्यात कोणीतरी साधूंनी मला विहिरी बाहेर काढले असे ही महिला गावातील नागरिकांना सांगत होती त्यानंतर या महिलेला दृष्ट्ठांत झाला आणि या विहिरीत भगवान महादेवाची पिंड असल्याचे सांगितले त्यानंतर काही गावकऱ्यांनी या महिलेवर विस्वास ठेऊन या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरु केले तेंव्हा गाळ काढत असतांना या विहिरीमध्ये महादेवाची पिंड ही उलटी पडलेली दिसुन आली ती पिंड गावकऱ्यांनी बाहेर काढून तिची या ठिकाणी स्थापना केली आणि श्री क्षेत्र नागरतास येथे राहात असलेले श्री संत भागवत गिरी व बालकगिरी बाबांना या विषयी माहिती देण्यात आली तेंव्हापासुन या संतांनी या ठिकाणी वास्तव्य करून ह्या देवस्थानामध्ये धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली असुन हजारो भक्तांच्या साहाय्याने येथील देवस्थानचा विकास सुरु आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....