बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने प्रयत्न करण्याची गरज - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड..
जालना जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने प्रयत्न करण्याची गरज आहे बालविवाह रोखण्याबाबत जनमानसामध्ये सर्वदूर जनजागृती करण्याबरोबरच जिल्ह्यात कुठे बालविवाह होत असल्यास त्याची माहिती 1098 व्या क्रमांकावर देण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
जिल्हा बाल संरक्षण विषयावरती जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर .एन. चीमंद्रे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी ,शिक्षणाधिकारी मा. कैलास दातखीळ, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर बनसवाल ,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे,चाईल्ड लाईनचे माधव हिवाळे ,समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमित गवली, बालकल्याण समितीच्या सदस्या श्रीमती. अश्विनी लखमाले ,एडवोकेट शिवरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती .जिल्हाधिकारी डॉ.राठोड म्हणाले की जालना जिल्ह्यात वर्षभरात 52 बाल विवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले आहे. जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येकाने सर्वकष प्रयत्न करण्याची गरज आहे .ग्रामीण भागामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जनमानसामध्ये जाणीव जागृती होण्याची गरज असून गावात कुठे बालविवाह होऊ नयेत .यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची यामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .लग्नाच्या वेळी धार्मिक गुरुनि शहानिशा न करता लग्न लावू नये .लग्न करणारे हे अल्पवयीन आढळल्यास धार्मिक गुरु वरती गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी चर्चा बैठकीमध्ये झाली बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरावर ती व तालुका स्तरावरती समित्या स्थापन करण्यात आले असून तालुकास्तरावर बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन झाल्या तालुकास्तरावर बैठका नित्यनेमाने व्हाव्यात या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना करत लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण होण्यासाठी पोस्को कायदा करण्यात आला असून याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांची तसेच महिलांवरील अत्याचारासंदर्भात दाखल गुन्ह्यांची माहिती प्रत्येक पोलिस ठाण्यांनी समितीला तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी जिल्हा कृती दलाचे कामकाज बाल संरक्षण विषयक कामकाज बालग्राम संस्थेचे काम बालका संदर्भात काम करणाऱ्या संस्था ,बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ ,सामाजिक तपासणी, अहवाल समुपदेशक, दत्तक विधान ,ग्राम तालुका व प्रभाग जिल्हा बाल संरक्षण समितीचे कामकाज आदी विषयांवरही विस्तृत आढावा घेतला..