भैय्यू महाराजांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे ‘हे’ तीन निकटवर्तीय दोषी..====================
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर न्यायालयाने दिनांक 28/1/2021 रोजी मोठा निर्णय दिला आहे. भय्यू महाराज यांना आत्महत्तेसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने तीन जणांना दोषी ठरवले आहे.
यामध्ये भय्यू महाराजांच्या सेवकाचाही समावेश आहे. भैय्यू महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी भैय्यू महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली आहे. तीन वर्षात ३२ साक्ष आणि १५० वेळा हजेरीनंतर या तिघांना आयपीसी कलम ३०६ अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या तिघांनाही प्रत्येकी सहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. १२ जून २०१८ रोजी भैय्यू महाराज यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्वरचा वापर करून आत्महत्या केली होती.
महाराजांना कुटुंबापेक्षा सेवकांवर अधिक विश्वास होता. त्यांनी त्यांचे आश्रम आणि काम सेवकांकडे सोपवले होते, त्याच सेवेकऱ्यांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की, त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.