रोहिना बु. येथे गेल्या दोन महिन्यापासून तलाठी गायब ! अबब!
परतूर तालुक्यातील रोहिना बु. या गावाला गेल्या दोन महिन्यापासून तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते. शेतकऱ्यांना तलाठ्याकडून दिला जाणारा सातबारा आहे तो मिळत नाही तलाठी गावात वेळेवर नसल्यामुळे फेरफार असेल हस्त लिखित 7/12 असेल नवीन रजिस्ट्रीची कामे जी आहे ती सुद्धा खोळंबलेली आहेत. तसेच तीन वर्षाचे शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सुद्धा वेळेवर मिळत नाही कारण की फाईल त्रुटी मध्ये काढले जाते त्याला जोडलेला सातबारा नसतो त्यामुळे . नमुना नंबर 8 अ अद्यावत करणे, वरीलप्रमाणे सर्वच कामे खोळंबली असल्या मुळे शेतकरी हतबल झाला आहे. आणि यामुळे आता प्रशासनाला आम्ही हाक देत आहोत की कोणी रोहिना बु. गावाला तलाठी देता का हो? अशी आरोळी देण्याची वेळ आली आहे. अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. तरी माझ्या गावाला तात्काळ तलाठी न दिल्यास तहसील कार्यालय परतूर येथे नारायण परसराम काळदाते या शेतकऱ्यांनी उपोषना ला बसण्याचा इशारा दिला आहे.