पिक विमा भरून हि मोबदला मिळाला नाहि , तक्रारीचा पाऊस पाडून सुध्दा , तळणी परीसरातील बहुसंख्य शेतकरी लाभा पासुन वंचित...
सग्रहीत
तळणी (रवी पाटील) मंठा तालुक्यातील तळणी परीसरातील पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत रीलायंन्स कंपनीच्या नावाने आपल्या शेतातील खरीप हंगाम वर्षे 2021 सोयाबीन ,मुग, ऊडिद,कापुस,तुर या पिकाचा विमा उतरविला होता . या मंडळात क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाला होता .यामुळे कंपनीने पिक वामा मंजुर केला पंरतु याचा मोबदला मोजक्याच शेतकऱ्यांना दिला. या बाबतीत बर्याच शेतकऱ्याने कपनीकडे तक्रारी केल्या तर काहि लोकांचे कंपनीने फोन उचलले नाहि नॉट रीचेबल दाखविले . या बाबतीत तालुका पिक विमा आधिकारी यांच्या कडे विमा भरलेल्या पावत्या देऊन तक्रारी केल्या तरी सुध्दा बविमानात काहि शेतकरी पिक विमा भरूनहि त्यांच्या खात्यावर पैसे आले नाहि.यवढ्या प्रचंड प्रमाणात अतिवृष्टि मुळे नुकसान होऊन सुध्दा मोबदला मिळत नाही तर शेतकऱ्याने विमा भरून तरी काय फायदा अशे सुभाष लाड , शर्मा सोनुने , रघुनाथ लाड, गौतम सदावर्ते , पिनू येऊल ,गुलाबसिगं जनकवार ,व इतर शेतकऱ्यांना विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना न्यायालयाने द्यावा .नसता शेतकरी रीलायन्स कंपनीने शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मोबदला द्यावा नसता शेतकरी कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहनार नाहि शेतकर्याचे या वर्षा च्या खरीप हंगामात आतोनात नुकसान झाले सरकार कडून तुंटपूजी मंदत मिळाली ती पण रक्कम नुकसानीच्या मोबदल्यात अत्यंत कमी आह हे क्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी शेकर्याच्या वतीने करण्यात आली असली तरी शासनाकडून ती पूर्ण झाली नाही
तळणी मंडळात या वर्षात सलग चार वेळा अतिवृष्टी झाली जिल्हाधिकार्यानी तळणी येथे येऊन स्वःत नुकसानीची पाहणी केली व पूर्ण मदतीचे आश्वासन शेतकर्याना दिले होते सपूर्ण तळणी मंडळात शेकडो हेक्टरवरील पिके आडवी झाली पिक विम्यासदर्भात शेतकर्यानी अनेक प्रकारच्या सुंचनाचे पांलन करून सुध्दा हक्काचा पिक विमा मिळवण्यासाठी आजही हजारो शेतकरी वंचीत आहे काही शेतकर्यानी ऑनलाईन ऑफलाईन तक्रारी केल्या तरी सुध्दा बऱ्याच शेतकर्याना पिक विमा भरून सुध्दा मदत मिळाली नाही आता परत मदत मिळवण्यासाठी शेतकर्याना आता परत कागदाची जुळवाजुळव करुन मंठा येथील पिक विमा कंपनीचे कार्यालयात खेटे मारावे लागत असून पिक विमा प्रतिनीधी कधीच कार्यालयात हजर राहत नसल्याने तक्रार दार शेतकर्याना अनेकवेळा मंठा येथून वापस यावे लागत असून शेतकर्याना आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे या शेतकर्याच्या समस्येकडे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनीधीनी लक्ष देण्याची मागणी शेतकर्यातून होत आहे
२०२१ चा पिक विमा भरलेला आहे व ज्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार केलेली आहे . व ज्यांना विमा आलेला नाही किंवा पैसे मिळाले नाही .अशा शेतकऱ्यांनी तक्रार पावती व विमा पावती ,आधार कार्ड ,बँक पासबुक ,सातबारा ,घेऊन विमा ऑफिस बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या पाठीमागे .येथे सर्व कागत पत्रे सादर करावे .
आर आर आघाव तळणी कृषी मंडल अधिकारी
या वर्षीच्या खरीप हंगांमाचे मोठे नुकसान झाले पूर्णा नदी काठचे पण मोठे नुकसान झाले शासनाची मदत ही शेतकर्याच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली तर पिक विमा संरक्षीत करून सुद्धा पिक विमा कपंनीवर प्रशासनाचे नियञण नसल्याने पिक विम्याच्या मदतीपासून शेतकरी वंचीत आहे त्याना पिक विमा मिळाला पाहीजे
नाना खंदारे द्राक्ष बागायतदार शेतकरी कानडी
पिक विमा कंपन्यावर राज्य सरकारचे कुठलेच नियञंण नाही शेतकर्याचे मोठे नुकसान असताना सुद्धा भरीव मदत शेतकर्याना मिळाली नाही देवेद्र फडणवीस मुख्यंमञी असताना पिक विम्याचा आधिकचा लाभ शेतकर्याना मिळाला होता उर्वरीत राहीलेल्या शेतकर्याना पण मदत मिळाली पाहीजे त्या साठी प्रयत्न करणार
बबनराव लोणीकर मांजी मंत्री आमदार परतूर मंठा