शिवरायांचा पुतळा ऊठवला तर? प्रशासनाला धडा शिकवला जाईल -काकडे
बुलढाणा(रवी पाटील) बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील लखोजी राजे राजवाड्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कुठलीही परवानगी न घेता बसवण्यात आला आहे. यावर प्रशासन हा पुतळा ऊठवण्याचा डाव आखत आसुन या सिंदखेडराजा तालुका व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात चांगलेच वातावरण तापले आहे. यात शेतकरी क्रांती सेनाने देखील ऊडी घेतली आसुन छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे, कष्टकरी कामकरी, शेतकरी व गोर गरीब जणतेचे म्हणजेच रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कुठं ऊभारायचा? हे जर प्रशासन ठरवत आसेल तर हि शोकांतिका आहे. प्रशासनाने परवानगी मंजुर करावी. पण पुतळा ऊठवण्याचे नाटकं करु नये. अन्यथा बुलढाणा जिल्हा प्रशासनाला धडा शिकवला जाईल आसा खणखणीत इशारा शेतकरी युवा नेते तथा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. शिवरायांच्या पुतळ्याला हात लावला तर बुलढाणा जिल्हाधिकारी यांना शेतकरी क्रांती सेनेचा हिसका दाखवला जाईल आसा ईशाराच शेतकरी आक्रमक युवा नेते सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.