सेवली जालना रोडवर दोन मोटरसायकल समोरा समोर धडकल्याने एक ठार तीन जखमी ================
. जालना तालुक्यातील सेवली जालना रोड वर सेवली पासून १ किमी अंतर वर अपघात झाला गोविंद धर्मा चव्हाण राहणार वय 48 व जखमीचे नाव बळी धना राठोड वय 50. सेवली वरून आपल्या घरी जात असताना समोरून भागडे सावरगाव येथील दोघीजणी येत असताना त्यांच्या गाडीने धडक दिल्याने हे चौघेही जखमी झाले .त्यामध्ये जखमी बळीराम राठोड, गजानन इंगळे, वय 30 व किशोर सदावर्ते वय 35 मोटर सायकल नंबर एम .एच. 21 बी. टी. 50 42 व दुसरी मोटरसायकल एम .एच. 28 3709 या दोन मोटारसायकली व जखमींना सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता या केंद्रामध्ये एकही डॉक्टर नसल्याने दवाखान्यामध्ये दोन ते तीन तास जखमी तडपत पडले होते .नंतर जखमींच्या नातेवाइकांनी जखमींना खाजगी वाहनातून जालना येथे नेण्यात आले सेवली येथे ॲम्बुलन्स असताना ॲम्बुलन्स मध्ये डिझेल टा का यला सांगितले त्यामुळे नातेवाईकांनी खाजगी वाहन करून जालना येथे गोविंद धर्मा चव्हाण या जखमींना जालना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता जालना सिविल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तीन जखमी चा उपचार जालना येथे चालू आहे.