जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी सहसचिवपदी सौ .उर्मिला खाडे यांची नियुक्ती..=======
परतूर तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी श्रीमती. उर्मिला सूर्यकांत खाडे यांची दि. 20 जानेवारी रोजी जालना जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या सहसचिवपदी एका पत्रकाद्वारे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नियुक्ती केली .यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेखा लहाने यांची उपस्थिती होती. यांच्या नियुक्ती निमित्त पालकमंत्री राजेश टोपे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख प्रदेश, सरचिटणीस बळीराम कडपे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, शिवाजी भालेकर राष्ट्रवादी ओबीसी सेल उपाध्यक्ष जालना, युवकचे तालुकाध्यक्ष ओमकार काटे, महिला आघाडी उपाध्यक्ष पुष्पा मुळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, तालुकाध्यक्ष शीला गोरे, सूर्यकांत खाडे, आदींनी अभिनंदन केले.