तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही -ह.भ.प. तुकाराम महराज मुंढे

तळणी ( रवि पाटील ) मी कोण आहे हे कळले पाहीजे यासाठी संत पाहीजे असतात तुकारामची कथा म्हणजे धर्मकथा आहे संत सहवास हा मनुष्य जीवनाचा आधार बनले पाहीजे जगदगुरु तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही तर ते आचरणात आणायसाठी असले पाहीजे तुकोबारायाचे चरित्र हे त्याग निष्ठा आणि समर्पन शिकवते वारकरी सप्रदायामध्ये अनेक अवतारीक पूरुष आहेत असे ऊदगार ह भ प तुकाराम महाराज मुढे परळीकर यानी तळणी येथील अखंड हरीनाम सप्ताह मधील पहील्या दिवशीच्या तुकाराम महाराज चरित्राचे कथन करताना व्यक्त केले 
महापूराषाचे चरिञ हे प्रेरणादाई असतात त्याचे चरित्र आपन आत्मसात केले पाहीजे महापुरुषाचा  भूतकाळ हा आपला वर्तमानकाळ असला पाहीजे छञपती शिवाजी महाराज विरशिरोमणी महाराणा प्रताप वीर सावरकर भगतसीगं राजगूरू सुखदेव सुभाषचंद्र बोस यांची चरीञ आत्मसात करणे सध्या गरजेचे आहे राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे मानवी जीवनात रामाचे आचरण तर कृष्णाचा विचार सध्याच्या मानवी जिवनात महत्वाचा आहे आणि ते आत्मसात करणे गरजेचे आहे संताकडे चारीत्र्य आहे म्हणून त्यानी चरित्र गहन करून घेतले आहे आजच्या या धावपळीच्या व विज्ञान युगात चारीत्र्य जपणे हे खूप कठीण काम झाले आहे मनुष्याच्या बाबतीत न घडलेल्या गोष्टी सुद्धा चवीने सांगून त्याची हेतूपूरस्कर बदनामी करणाऱ्याची टोळी समाजात सक्रीय .आहे त्या टोळीचा प्रभाव आपल्यावर होऊ द्यायचा नसेल संतसंगाची व भक्ती मार्गाची कास मनुष्याने धरने गरजेचे आहे जगदगूरू . तुकोबारायांच्या काळात सुध्दा अशी अविवेकी प्रवृतीची मानसे होती पण त्या वृत्तीचा साधा स्पर्श सुध्दा तुकोबांरायांना झाला नाही कारण भगवान पांडूरंगांवर असलेली 
बळकट भावना व भक्ती साधनेची एकाग्रताच मंहाराजांना वैकुठाची प्राप्ती करून दीली असे महाराजानी यावेळी उपस्थीताना सांगून मञ मुग्ध .केले 

गेल्या .पंधरा वर्षापासून तळणी  ग्रामस्थ व श्री संत सेवा तरुण मंडळाकडून या सप्ताहचे आयोजन करण्यात येते या वर्षी  या सप्ताहाचे हे सोळावे वर्ष असून सपूर्ण मंठा तालूक्यात प्रसिद्ध सप्ताह म्हणून त्याचा नावलौवकीक आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....