नाना पटोले यांच्या पंतप्रधान मोदी विषयी च्या त्या वक्तव्याचा परतूर येथे निषेध,कार्यकर्त्यांनी केले जोडे मारो आंदोलन,पटोले वर गुन्हा दाखल करा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची मागणी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयी गरळ ओकणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा नसता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात पटोले ना फिरू देणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले आहे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अतिशय अभद्र प्रकारची भाषा वापरली असून ही भाषा खपवून घेतले जाणार नसल्याचे राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे
देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेले पंतप्रधान यांच्या बाबतीत अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या पटोले वर रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही राहुल लोणीकर यांनी केली असून आज परतूर येथे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशाने युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करीत जोडे मारो आंदोलन केले यावेळी नाना पटोले यांच्या छायाचित्राला जोडे मारून कार्यकर्त्यांनी आपला रोष प्रगट केला यावेळी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले माजी सभापती सिद्धेश्वर सोळंके रवी सोळंके ज्ञानेश्वर सोळंके नितीन जोगदंड प्रफुल शिंदे सरपंच निर्धास्त राठोड राजेंद्र वायाळ अमर बगडिया प्रकाश वाघमारे मलिक कुरेशी नरेश कांबळे गणेश सोळंके गणेश कदम विष्णू उगले बंडू भुंबर विष्णू मचाले शुभम कातोरे प्रसाद ढवळे सिताराम मुजमुले यांच्यासह कार्यकर्यांची उपस्थिती होती