मंठा तालूक्यातील ९०% अनुदान जिल्हा बँकेकडून शेतकर्याना वाटप ,अतिवृष्टीचेअनूदान वेळेवर,मिळाल्याने शेतकर्यात समाधान




तळणी (रवी पाटील)मंठा तालूक्याती चारही जिल्हा  मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून वेगाने  वाटप .करण्यात आले असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले  खरीप हंगामाच्या शेवटी शेवटी झालेल्या अतिवृष्टी मृळे सपूर्ण तालुक्यात मोठे नुकसान झाले होते या नुकसान भरपाई पोटी शासनाने पॅकेज देऊन थोडाफार आधार दीला असुन अनुदान त्वरीत शेतकर्याच्या खात्यामध्ये जमा करून त्याना ते वाटप करण्यात जि़ल्हा मध्यवर्ती बँकेचे मोठे योगदान आहे हे अनुदान वाटप चालु असतानाच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान नीधीचा दोन हजार रुपयाचा २०२१चा शेवटचा हप्ता सुध्दा याच दरम्यान आला अपूरे कर्मचारी व कोरोनाचे नियम पाळून हे वाटप. सुधा बहुतांश शेतकर्याना वाटप करण्यात आल्यानतर लगेचच काही शेतकर्याना पीक विमा मंजूर झाला तो सुध्दा वाटप करण्यात आला नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम शेतकर्यासाठी कमी जरी असली तरी विविध लाभातून शेतकर्याना मिळालेली मदत ही वेळेवर मिळाल्याने त्या मदतीचा मोठा आधार दीवाळी सणासाठी  व रब्बीच्या लावगडी साठी शेतकर्या ना आधार झाली 

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे राज्य शासनाकडून दोन टप्यात देण्याचे नियोजन करण्यात आले होते त्यानुसार सुरवातीचा पच्याहत्तर टक्के रकमेचा पहीला हप्ता जवळपास ९०% टक्के शेतकर्याना बँकाकडून वितरीत करण्यात आला आहे उर्वरीत राहीलेली पच्चवीस टक्के मदत अजून पर्यन्त राज्य सरकारकडून बँकाना प्राप्त झाली नसुन त्या उर्वरीत मदतीचा निधीची प्रतीक्षा आता शेतकर्याना आहे  तालुक्यातील बहुंताश शेतकर्याना या अनुदानाचा लाभ मिळाला असुन तेरा हजाराच्या वर शेतकर्याना या मदतीचा फायदा  मिळाला आहे 

राज्य .शासनाकडून पच्चाहत्तर टक्के अतिवृष्टीची मिळणारी मदत शेतकर्याना वितरीत करण्यात आली आहे जे शेतकरी बाहेरगावी किवा मयत आहेत अशाची रक्कम खात्यात जमा आहे उर्वरीत २५ % रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यावर वितरीत करण्यात येईल या साठी शेतकर्याना आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याची प्रातिक्रीया 
*राजेद्र कुमार म्हस्के प्रभारी व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा मंठा*


या वेळेस खरीपाचे मोठे नुकसान झाले शासनाची मदत कमी असली तरी वेळेवर .भेटल्याने रब्बीच्या लाव गडीसाठी कामी आली उर्वरीत रक्कम शासनाने लवकर दयावी 
*माधवसिह सोळकें शेतकरी तळणी*

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....