मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना कोविड सुरक्षा साहित्य वाटप,सामाजिक दायित्व निभावून समाज हिताचा विचार करणार -- सरपंच शत्रुघ्न कणसे
तालुक्यातील दैठना बू. येथील सरपंच तथा भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी आपल्या मुलांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून वाढदिवसानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना कोविड पासून बचाव करण्यासाठी सुरक्षा साहित्य व गरजूंना १०० ब्लँकेट वाटप केले आहेत.
जयश शत्रुघ्न कणसे यांच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त दैठना बू व हरेराम नगर येथील प्रशाला येथे कोविडच्या प्रादुर्भावमुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे त्याचीच खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून मास्क सॅनिटायझर, व खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना केले. तसेच येथील गरजवंताना थंडीपासून संरक्षण व्हावें यासाठी शंभर ब्लँकेट वाटप करण्यात आले. मागील दोन वर्षात कणसे कुटुंबियांनी वाढदिवसाचे औचित्य साधून हरेरामनगर येथील मंदिर जिर्णोद्वार देणगी दिली तसेच गंगाभारती संस्थान दैठना फाटा येथे देणगी. परतूर येथील मराठा क्रांति भवनासाठी रोख स्वरुपात देणगी, ऊसतोड कामगारांना ब्लँकेट, मागील वर्षी कोरोंना काळात डॉक्टरांना कोविड सुरक्षा साहित्य ५० किट, राममंदिर निधि संकलनात सहभागी होत निधि देण्यात आला. यासह आदि सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होत आहेत. दि. १७ जानेवारी २०२२ रोजी जयश याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्य कणसे कुटुंब गेल्या चार वर्षापासून मुलाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून समाजप्रती असलेले दायित्व निभावत आहेत. सामाजाने यातून बोध घेऊन समाज उपयोगी उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
दैठना बू येथील सरपंच तथा भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे बोलताना म्हणाले की शासनाने कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने कोविडचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात शालेय विद्यार्थ्यांना कोविड पासून बचाव करण्यासाठी लागणारे मास्क, सेनिटायझर, यासह सुरक्षा साहित्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरविल्या जाईल.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
यावेळी वसंतराव बेरगुडे शामराव चव्हाण राधेगोविंद रेपे आसाराम रेपे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल नरवाडे हरेराम नगर चे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके, मा अध्यक्ष परमेश्वर रेपे अशोक बेरगुडे श्रीराम मोरे माऊली गायके पंडित नवल संतोष रेपे उपाध्यक्ष सुशील कणसे, तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ सोळुंके मुख्याध्यापक एम पवार सर मुख्याध्यापक एम काळे सर शिक्षिका श्रीमती अंभोरे मॅडम, उद्धव कणसे, भरत कणसे, ग्रा.पं सदस्य किसन मखमले, ग्रा.प सदस्य काळूजी भदर्गे, सुधाकर कणसे, विद्यार्थी पालक व गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.