जिजाऊ जयंती विशेष




मंठा (सुभाष वायाळ)दि.12 जानेवारी हा दिवस स्वराज्याचे स्वप्नण साकार करणार्‍या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रताप शादी संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा हा जन्मदिवस. आई ही जगातील महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आहे आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवाजी महाराजांना घडविले. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली मुघलांच्या अन्यायाच्या पर्दा फाश करण्यासाठी स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवराया मध्ये नितांत श्रद्धा निर्माण केली. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शिंदखेड गावात झाला त्या मराठा लखोजी राजे जाधव आणि माळसा राणी यांच्या कन्या होत्या. सिंदखेड मध्ये त्यांनी राजकारण आणि युद्धकलेत प्रभुत्व मिळवले होते. पुढे जिजाऊंनी त्याचा उपयोग शिवरायांना शिक्षण देण्यासाठी केला डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा दौलताबाद येथील शहाजी राजांची विवाह झाला. १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊ बाल शिवाजी राजा सह राहण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. तेव्हा पुण्याची अवस्था फार वाईट होती स्वराज्य स्थापन करणे ह्या शिवाजी राजांच्या समजूतीमागे जिजाऊंची संस्कृती व शिकवण कारणीभूत होती. जिजाऊंनी शिवाजीराजांना राजकारण करण्याचे समान न्याय देण्याचे आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे धैर्य दिले होते. त्याकाळी प्रभुत्व मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शस्त्रास्त्र व प्रशिक्षण प्रशिक्षणावर जिजाऊंची कर्डी नजर होती. शिवरायांच्या आठ विवाह मागील मुख्य उद्देश हा विखुरलेला मराठी समाजाला एकत्र आणण्याचा होता. वेळोवेळी झालेली राजकीय उलथापालथ अशा अनेक प्रसंगी जिजाऊंचे मार्गदर्शन शिवाजीराजांना मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज मोठमोठ्या मोहीम आवर असताना जिजाऊंनी स्वतः राज्याचा कारभारावर बारीक लक्ष ठेवले होते. मुलांना वडिलाकडुन कर्तव्य आणि आईकडून सद्गुन आणि प्रेम मिळते पण, जिजाऊ याला अपवाद आहेत शहाजी राजांच्या अनुपस्थित त्यांनी दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. जिजाऊंनी केलेल्या या संस्काराच्या बळावर छत्रपती शिवाजीराजांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांना मोगल बादशहाने आग्रा येथे कळत केले तेव्हा स्वराज्याची सत्ता जिजाऊ मा साहेबांच्या हाती होती. हिंदवी ्वराज्याच्या मार्गात येणार्‍या प्रत्येक शत्रूशी जिजाऊंच्या निर्भय पद्धतीने मुकाबला करण्याचे धैर्य छत्रपती शिवरायांना मिळाले. जिजाऊंनी आपल्या मुलाला सिंहासनावर बसलेले बघेपर्यंत लढा दिला. 17 जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी राजे यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. अवघ्या बारा दिवसांनी त्यांनी स्वतंत्र मराठा स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. जिजाऊ तुम्ही नसता तर... नसते झाले शिवराय नी शंभूछावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा... जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे.... जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

जिजाऊ स्त्री सक्षमा फाउंडेशन -- सुलोचना देशमुख मंठा जि.जालना

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....