मुलाच्या जन्मदिनाचा खर्च टाळून एस टी कामगारांना राशन वाटप...
एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरणासाठी तसेच आर्थिक विवंचनेला कंटाळून ८३ कर्मचाऱ्यांनी आत्मत्याग केला. त्यांच्या दुःखात सामील होऊन गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा दुखवटा पाळून परतुर आगारातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाचा लढा लढत आहेत. परंतु महामंडळाने गेल्या तीन महिन्यापासून कामगारांना पगार न दिल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येत आहेत त्याची जाण ठेऊन माझ्याकडून काही मदत करता येईल का या उद्देशाने तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माजी पाणी पुरवठा मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तथा दैठना खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी त्यांचा मुलगा शंभूराजे यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा करून व्यर्थ खर्च टाळून एसटी कामगारांना एका महिन्याचे राशन वाटप केले. माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तसेच दैठणा खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी सर्वच गरजू एसटी कर्मचाऱ्यांना वाटप केले.
त्यांच्या या स्तुत्य विचारातून परतुर आगारातील गरजू कामगारांना राशन दिले बद्दल गणेश कानडे, कल्याण सोळंके, भुजंग माकोडे, मुकुंद भालेराव, राजबिंडे तसेच इतर सर्वच एसटी कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले...