यश ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



  परतूर (शेख अथर )तालुक्यातील सातोना खुर्द येथे यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यश इंग्लिश स्कूल येथे  73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण युवानेतृत्व  यश महेशराव  आकात  यांच्या हस्ते करण्यात आले.   याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून यश महेशराव आकात , स्वप्निल  आकात ,विलासराव लाटे,अनंतराव आकात, संतोष आकात ,आकाश आकात, संदीप कवडे , शामीर शेख , यश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  जयराम खंदारे व यश इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल अनिल बोराडे  यांची उपस्थिती होती . 
      कार्यक्रमाचे  प्रस्ताविक जयराम खंदारे  यांनी केले, तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्व यश महेशराव आकात व  संदीप कवडे  यांनी सांगितले. राष्ट्रीय सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याबरोबरच प्रत्येक भारतीयाने  आपल्या क्षेत्रात महान कार्य करून देशहितासाठी महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे असे आवाहन यश आकात यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  बळीराम भले  यांनी केले.कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....