एसटी कर्मचार्या करीता धावून आले समाज सेवक इज्जरान कुरेशी , केले किराणा किटचे वाटप
परतूर /हनूमंत दंवडे
गेल्या अनेक दिवसापासून एस टी कर्मचारी हे संपावर असल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यांचा कुटुंबांना आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्ये इज्जरान कुरेशी यांनी पुढाकार घेत एस टी कर्मचारी यांना रविवारी किराणा किटचे वाटप केले
सध्या एस.टी. कर्मचारी हे संपावर आहेत त्यातच कोरोना ची चौथी लाट आलेली आहे या काळात गरीब गरजू कुटुंब अनेक अडचणीचा सामना करीत उदरनिर्वाह करीत आहे. कोरोंना काळात अनेकांच्या नौकार्या गेल्या रोजगार बुडाला तर एस टी कर्मचारी यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला मात्र त्याच्या मागण्या शासन मान्य करीत नसल्याने व्यथित झालेल्या अनेकांनी आत्महत्या केल्या. मात्र त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्सभवत असल्याने अनेक कर्मचारी संकटात सापडला आहे असे असतांना कुणाकडे आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी गाऱ्हाणे न मांडता जीवन जगत आहे. कुणी हताश होऊन चिंतेत जगत आहे. त्यांच्या भावना ओळखून त्यांच्या परिवारांची काळजी घेत सामाजिक कार्यकर्त्ये व हाजारोचे चहाते भावी नगरसेवक इज्जरान कुरेशी यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून एस टी कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबीयांना जगण्याचा हातभार लावण्याचा संकल्प करून एक महिन्याचे किराणा समानाचे किट वाटप केले. त्यांच्या वेदनेवर फुंकर मारण्याचे कार्य या निमित्यांना कुरेशी यांच्या हातून घडले आहे.