लघु उद्योजक, तरुणांसह शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प, नदीजोड प्रकल्पामुळे देश अधिकाधिक सुजलाम सुफलाम बनण्यासाठी मदत होईल - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया, गुंतवणूक, उत्पादन, अत्याधुनिक शेती, सिंचन, शिक्षण, रस्ते वाहतूक, ग्राम विकास, शहरी भागाचा विकास, वैद्यकीय सुविधा, रेल्वे इत्यादी अनेक बाबींचा अर्थसंकल्पात समावेश करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय अर्थमंत्र्यांचे लोणीकर यांनी मानले आभार
पंतप्रधान मा श्री नरेंद्र जी मोदी यांच्या दूरदर्शन नेतृत्वाखाली सलग ८ वा आणि या पंचवार्षिक मधील देशपातळीवरील ३ रा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री मा श्रीमती निर्मला सीतारमण जी यांनी आज संसदेत सादर केला हा अर्थसंकल्प लघुउद्योजक तरुण आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प असून बहुप्रतिक्षीत असलेल्या शेतकऱ्यांच्या हा मी भावाबाबत या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली असून सर्व दृष्टीने समर्पक आणि लोकाभिमुख अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिली.
नदीजोड प्रकल्प हा स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी जी वाजपेयी यांच्या काळातील सरकारपासून ते विद्यमान केंद्र सरकार पर्यंत अत्यंत महत्त्वाकांक्षी असा विषय राहिला आहे त्याच नदीजोड कार्यक्रमांतर्गत पाच प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून संपूर्ण देशातील नद्या एकमेकांना जोडून देशाला सुजलाम आणि सुफलाम बनवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे त्यामुळे पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याबरोबरच उद्योग जगताला देखील मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. सिंचनासाठी ६००० कोटी रु तरतूद करण्यात आली असून शेतीला या अर्थसंकल्पात मोठं स्थान देण्यात आलं आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
आरोग्य सुविधा वाढवण्यावर केंद्र सरकार भर बदेणार असून लसीकरणावर सरकारचा अधिक भर राहील असेही या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या हमीभावाची मागणी लक्षात घेता २.७ लक्ष कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या पिकाचे योग्य मूल्य त्यांना मिळावे यासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येते लघुउद्योजक आणि तरुणांना अधिकाधिक लाभ व्हावा या दृष्टीने साठ लाखापेक्षा अधिक नोकऱ्या आणि लघु उद्योगांसाठी सहा हजार कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ही बाब देखील अत्यंत प्रशंसनीय आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
नाबार्ड योजनेच्या माध्यमातून तरुणांना संधी मिळावी यासाठी कृषी उत्पादन आणि ग्रामीण स्टार्टअप यासाठी अर्थपुरवठा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील आज या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांचे देखील स्वतःचा व्यवसाय करण्याची स्वप्न सत्यात उतरेल अशी अपेक्षा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करायला हरकत नाही गुंतवणूक, उत्पादन, शेती, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्राम विकास, शहरी भागाचा विकास, वैद्यकीय सुविधा इत्यादी अनेक बाबींचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. आधुनिक शेती बरोबर झिरो बजेट शेती, सेंद्रिय शेती यांच्या अभ्यासक्रमाला दिले जाणारे प्रोत्साहन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद रेल्वे मार्गाने वंदे भारत नावाने रेल्वे आणि रस्ते निर्माणासाठी केली जाणारी मोठी गुंतवणूक २५ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर अत्यंत बारकाईने केंद्रसरकारने विचार केला असून त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात अधिकाधिक प्रगती होईल अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
२०२२-२०२३ या काळात ८० लाख घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधली जाणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवत रोजगार निर्मिती व्हावी यासाठी या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे डिजिटल करन्सी, किसान ड्रोन, लष्करी उत्पादनात आत्मनिर्भरता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, डिजिटल विद्यापीठे यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबींसाठी १ लक्ष कोटींपेक्षा अधिक निधी ची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे या अर्थसंकल्पात अत्यंत कल्पकतेने सर्वसामान्य घटकाला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे त्याबद्दल पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी, केंद्रीय अर्थमंत्री मा.श्रीमती निर्मला सीतारामन जी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.डॉ. भागवत कराड जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो असेही लोणीकर यावेळी म्हणाले.