गाडगेबाबांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजीविरुद्ध समाज प्रबोधन केले.-.अॅड महेंद्रकुमार वेडेकर
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
लोकांना सांगण्यापूर्वी स्वतः कृती केली व त्यातून सामाजिक प्रश्नांचा विचार गाडगेबाबांनी पुढे नेला असे प्रतिपादन अॅड महेंद्रकुमार वेडेकर यांनी केले. परतूर तालुक्यातील लिंगसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते.
लिंगसा येथील सरपंच व गावकरी यांच्या वतीने गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. पुढे ते म्हणाले गाडगे बाबांनी आपल्या सहज सोप्या सवांदाने समाजाची मने प्रवर्तित केली लोकांच्या मनातील अज्ञान ,अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड, आदी समाजविघातक बाबीवर त्यांनी सडकून टीका केली. मायबाप शिक्षण हीच तुमच्या विकासाची व प्रगतीची गुरुकिल्ली आहे घरातील भांडे कुंडे विकून शिक्षण घ्या असा उपदेश ते करत असत गाडगेबाबा नी नुसते विचार सांगितले नाही तर कृतीशीलताही अंगी मानवली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याची नोंद घेतली .बाबासाहेब गाडगे बाबांचे किर्तन ऐकायला आवर्जून जात असतं तसेच त्यांच्याबरोबर सल्लामसलत करत असत त्यांना ते गुरु मानत असत असा महापुरुष पूर्वी कधी झाला नाही . यावरून गाडगेबाबा विषयीचे महत्त्व आपल्या लक्षात येते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन कैलास पिसाळ यांनी मानले . याप्रसंगी हनुमंत दवंडे (मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष परतूर) ,इंद्रजित डवले(ग्रा.प. उपसरपंच लिंगसा, ग्रामपंचायत सदस्य बाबाराव डवले, - विठ्ठलराव दराडे, अण्णासाहेब डवले, सचिन डवले, दत्ताराव पितळे, डिगांबर भले, सर्जेराव, आप्पा घनवट, हनुमान पिसाळे, लक्ष्मण पिसाळ, आदींची उपस्थिती यावेळी होती..