दैठना येथे गॅसचा भडका, घर जाळून खाक घरासह संसार उपयोगी साहित्य नगदी दोन लाख रुपये रक्कम जळून खाक


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 
तालुक्यातील दैठना खुर्द येथे दत्ता विष्णु सवने यांचे घरी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याची आईने गॅस पेटवला असता गॅसचा भडका झाल्याने घरातील संस्कार उपयोगी साहित्य व नगदी रोख रक्कम जाळून खाक झाल्याची घटना दि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शेतकरी दत्ता सवने यांच्या आई सकाळी घरी आठ वाजेच्या सुमारास चहा करण्यासाठी गॅस पेटवित असतांना अचानक भडका झाल्याने आगीने रोद्ररूप धारण करून लाकडी माळवद असल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. ग्रामस्थांनी आग विझविन्यासाठी अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आले. अग्निशामक व गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणली. गॅस टाकीचा विस्फोट न झाल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरासह घरातील एक किंट्टल गहू, ज्वारी, किराणा, कपाट, कपडे, लोखंडी टीन पत्रे, व नगदी रोख रक्कम दोन लाख तीन हजार रुपये जाळून खाक झाले. असा अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी अनिल पारिख, फायरमन अमित कनाके, प्रशिक्षणार्थी सुनील काळे, संदीप हिवाळे, तसेच गावातील शिवाजी सवने, दीपक सवने, भागवत सवने, गणेश सवने, बंडू सवने, हरिभाऊ सवने, अमोल सवने, लक्ष्मीकांत सवने, विकास सवने, तातेराव सवने, प्रकाश सवने, वचीष्ठ भुंबर, विशाल सवने, प्रकाश सवने, दत्ता सवने, ज्ञानेश्वर सवने, बंडेराव ज्ञानेश्वर सवने, सरपंच सोनाजी गाडेकर, रंगनाथ सवने, आतिश गाडेकर, हरी गाडेकर, दत्ता सवने, भास्कर सवने, ईश्वर भुंबर, यांच्यासह आदींनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी तलाठी श्रीमती किरण जोशी, तसेच गॅस एजन्सी संचालक योगेश भोगल, दत्ता बाळकुंड, यांनी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात