मंठा तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणासाठी १६० लसीकरण केंद्र


मंठा प्रतिनिधी /सुभाष वायाळ
            दि.२५ मंठा तालुक्यात दिनांक २७ फेब्रुवारी रविवार रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. यासाठी तालुक्यामध्ये १६० लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली या ठिकाणी तालुक्यातील १८ हजार ९३० या पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना मोफत पोलिओ डोस दिला जाईल. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांनी सांगितले आहे. 
      पल्स पोलिओ लसीकरणासाठी तालुक्यात एकूण १६० लसीकरण बुथ उभारण्यात आले आहेत. सर्व लाभार्थी ना लस मिळावी यासाठी एसटी स्टँड,बांधकामाची ठिकाणी, रस्त्यांची कामे,ऊसतोड कामगार,वीटभट्ट्या,वाड्या इत्यादी ठिकाणाच्या लसीकरणासाठी ०७ मोबाईल पथक,०७ ट्राजिस्ट टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. असे तालुका नर्सिंग ऑफिसर अर्जुन हमिर्गे यांनी सांगितले. 
या लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून ०६ वैद्यकीय अधिकारी,३३ सुपरवायझर ४३६ आरोग्य कर्मचारी,एन.एम.एम,एम.पी.डब्ल्यू, अंगणवाडी,गटप्रवर्तक,अशा इत्यादी स्वयसेवक परिश्रम घेणार आहेत.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात