माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना विकास रत्न पुरस्कार जाहीर,सोनार सेवा महासंघाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत परभणी येथे दिला जाणार पुरस्कार,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकासकामा बद्दल वाढदिवसाचे औचित्य साधून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिला जाणार पुरस्कार

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 
  सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना विकास रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार दिनांक 02 मार्च रोजी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री हरी मंगल कार्यालय परभणी येथे दिला जाणार असल्याची माहिती सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला दिला जातो यावर्षी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार यांना विकास रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्यांनी केलेल्या परभणी लोकसभा मतदार संघातील विकास कामांबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे
    पुढे या पत्रकात म्हटले आहे की माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी गेल्या सहा सात वर्षांमध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये पाणीपुरवठामंत्री पदाचा भार सांभाळताना राज्यात यापूर्वी कधीही माहित नसलेल्या खात्याला नवसंजीवनी देत राज्यभरामध्ये 18000 गावामध्ये पाणीपुरवठा योजना केल्या त्याच बरोबर राज्यात 70 लाख शौचालय बांधून स्वच्छतेच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक एक मिळवून दिला हे करीत असताना परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी समाधान शिबिराच्या माध्यमातून पंतप्रधान उज्वला गॅस योजनेतील मोफत सिलेंडर वाटप शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप शेती उपयोगी अवजारांचे वाटप महिला बचत गटांना कर्ज वाटप विविध प्रकारची प्रमाणपत्रे जसे अपंगत्वाचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे उपक्रम राबवत परभणी लोकसभा मतदारसंघातील तीन लाख लोकांना या समाधान शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला
   मराठवाड्यात नियमितपणे दुष्काळ पडतो हे ध्यानात घेऊन येथील पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आखली मात्र राज्यातील सरकार बदलामुळे सद्यस्थितीमध्ये ही योजना ठप्प आहे
======================
*विविध महामार्गांना मंजुरी मिळवून दळणवळणाचा मार्ग सुकर केला*
======================
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितींनजी गडकरी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जिंतूर औंढा नागनाथ सहापूर वसमत नांदेड राज्य महामार्गाचे पुनर्वसन व आधुनिकीकरण करण्यासाठी 170 कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग 62 (रा मा 222) रस्त्यावर परभणी बायपास चे चौपदरीकरणासाठी 250 कोटी रुपये, मुरमा- औसा- लातूर- रेणापूर- पानगाव -धर्मापुरी -परळी वैजनाथ- इंजेगाव- पाथुर -लोणार -खामगाव 600 कोटी रु हट्टा-पूर्णा मार्गाची दुरुस्ती 12 कोटी रुपये पैठण अंबड घनसावंगी कुंभार पिंपळगाव आष्टी पाथरी परभणी रस्ता, इंजेगाव सोनपेठ पाथरी सेलू देवगाव फाटा मंठा लोणार खामगाव 1008 कोटी रुपये यासह अनेक रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देत नागरिकांना अतिशय जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांनी परभणी जिल्ह्यात केलेल्या विकास कामांमुळे विकास रत्न हा पुरस्कार आमच्या सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे
=======================
*समाधान शिबिरातील सर्वसामान्य जनतेच्या केलेल्या कामाबद्दल मंत्री नितीन गडकरी व तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या कामाचे कौतुक*
=======================
राजकीय व्यासपीठावर काम करत असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी समाजभान राखत समाधान शिबिरा सारखा अनोखा उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याबद्दल परभणी येथे संपन्न झालेल्या हजारोच्या संख्येने चा ागरिकांची उपस्थिती असणार्‍या समाधान शिबिराच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी माजी मंत्री लोणीकर यांनी राबवलेल्या समाधान शिबिराचे तोंडभरून कौतुक केले होते या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने परभणी लोकसभा मतदार संघाला लाभलेले विकास रत्न माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर असल्याचे सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांनी पत्रकात म्हटले आहे
=======================
*आमदार लोणीकरांचे सामाजिक व धार्मिक कार्यातही मोठे योगदान*
======================
गेल्या पस्तीस वर्षांपासून राजकीय पटलावर काम करत असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी 
  देहू आळंदी येथे झालेल्या राष्ट्रीय वारकरी संत संमेलनाच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी शिरावर घेऊन देशभरातून आलेल्या वारकरी संप्रदायाच्या संत महंतांची उत्तम भोजनाची व्यवस्था केली हे करीत असताना या संमेलनावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवर्षाव करीत सर्व संत महंतांचे स्वागत केले
 त्यांनी केलेल्या या विकासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोनार सेवा महासंघाच्या वतीने यावर्षी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना विकास रत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत डहाळे यांनी म्हटले आहे
   येत्या 02 मार्चI रोजी सकाळी 11:00 वाजता परभणी येथे मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत डहाळे यांनी दिली असून यावेळी ज्येष्ठ पत्रकार संपादक विजय जोशी भाजपा विभागीय संघटन मंत्री संजय कोंडगे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार मेघना ताई बोर्डीकर युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर माजी आमदार मोहन फड विजयराव वरपूडकर मा आमदार रामराव वडकुते भाजपा जिल्हाध्यक्ष परभणी ग्रामीण डॉ सुभाष कदम भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद जी भरोसे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ प्रफुल्ल पाटील माजी सभापती कृउबा बोरी शिवहरी खिस्ते भाजपा जिल्हा सरचिटणीस भाजपा जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब जामगे ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव रामकिसन रौदळे, भाजपा सरचिटणीस एन डी देशमुख भाजपा सरचिटणीस ग्रामीण प्रमोद वाकोडकर भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विधाताई चौधरी परभणी जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी ग्रामीण सुप्रिया ताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भाजयुमो परभणी जिल्हा ग्रामीण सुरेश भुमरे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शहर रामदास पवार भाजयुमो युवती संयोजिका गीताताई सूर्यवंशी सरचिटणीस संजय रिझवानी भाजपा प्रदेश सदस्य मोहन कुलकर्णी प्रदेश सदस्य संजय शेळके मा नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल नगरसेविका मंगलताई मुदलकर नगरसेवक अशोकराव डहाळे नगरसेवक रितेश जैन नगरसेवक डॉ विधाताई पाटील नगरसेवक नंदकिशोर दरक नगरसेवक मोकिंद खिल्लारे नगरसेवक सुनील देशमुख नगरसेवक मधुकर गव्हाणे नगरसेवक प्रशांत सांगळे भाजपा जनसेवक बाळासाहेब जाधव प्रदेश सदस्य अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत डहाळे यांनी केले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....